रेशीम उद्योगासाठी तुती लागवड कार्यशाळा संपन्न*….
*रेशीम उद्योगासाठी तुती लागवड कार्यशाळा संपन्न*….
प्रतिनिधी नाशिक जनमत आज सावळघाट ता. पेठ येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेमध्ये तालुक्यात करण्यात आलेले तुती लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत निवड करण्यात आलेले लाभार्थी तसेच या योजनेमुळे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी झालेला फायदा याबाबत आपल्या प्रस्ताविक श्री जे एस गारे विस्तार अधिकारी कृषी केले. श्री संतोष एल राठोड कृषी अधिकारी यांनी रेशीम लागवड बाबत व कृषी विभागाच्या विविध योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना बाबत माहिती व मार्गदर्शन केले व माहिती दिली. तुती लागवड बाबत सविस्तर सविस्तर तांत्रिक माहिती कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री
विजयकुमार धात्रक यामध्ये तुती लागवड ते अंडे ते कोश लागवड यामध्ये संगोपन ग्रह उभारणी बाबत माहिती देण्यात आली श्री ओंकार जाधव ईपीओ रोजगार हमी कक्ष प्रमुख उपस्थित शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले श्री संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी तुती लागवडीचे महत्त्व विशद करून आदिवासी बहुल तालुक्यामध्ये स्वयंरोजगार संधी निर्माण होऊन शाश्वत उत्पादनाची खात्रीशीर उत्पन्न मिळून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे.. यामध्ये विशेषतःह महिला शेतकरी यांनी सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे तसेच शासनाच्या लखपती दीदी कार्यक्रम मास पाठबळ मिळणार आहे उपस्थित शेतकऱ्यांना पुढे संबोधित करताना श्री संजय शेवाळे यांनी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेत्र तुती

लागवड खाली आणावे असे आव्हान करण्यात आले सदर कार्यशाळेस श्री मिलिंद भोये आड बुद्रुक व श्री एकनाथ मोरे करंजखेड यांनी आपल्या रेशीम शेती बाबत आपले अनुभव कथन केले आणि उपस्थित शेतकऱ्यांना तुती लागवड अत्यंत फायदेशीर असल्याचे नमूद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे सहभाग नोंदवावा असे आव्हान केले या कार्यशाळेसाठी श्री मनोज भोये सरपंच सावळघाट व श्री तुळशीदास भोये रेशीम लागवड शेतकरी सावळ घाट बचत गटाचे सवलता टोपले प्रभाग संघ सचिव करंजाळी यांनी शेतकऱ्यांना संगोपन ग्रह बांधकाम करण्यासाठी एक लाखापर्यंत बचत गटामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले महिला बचत गट गटाचे पदाधिकारी पंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला शेतकरी रेशीम लागवड शेतकरी तसेच ग्रामरोजगार सेवक तांत्रिक सहाय्यक असे एकूण 122 शेतकरी उपस्थित होते या योजनेसाठी माननीय श्री अर्जुन गुंडे अति मु.कार्यकारी अधिकारी व श्री जेटी सूर्यवंशी गटविकास अधिकारी पंचायत समिती पेठ श्री सुनील बागुल साहयक गटविकास अधिकारी पंचायत समिती पेठ यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री संतोष राठोड श्री जयवंत गारे विस्ताराधिकारी कृषी श्री सचिन जाधव विस्ताराधिकारी कृषी व श्री तुळशीराम भोये सावळघाट यांनी परिश्रम घेतले.., ( जिल्ह्यात 1000 एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट माननीय श्री ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक.. नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अत्यंत प्रगतशील असून रेशीम उद्योग हा शेती पूरक व्यवसाय म्हणून शाश्वत आर्थिक उत्पन्न खात्रीशीर पर्याय आहे आज पर्यंत नाशिक जिल्ह्यात पंधराशे एकवीस शेतकऱ्यांची तुती लागवड साठी निवड करण्यात आली असून 856 प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे पैकी जिल्ह्यात 394 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड पूर्ण करण्यात आली असून 112

रोपवाटिका तयार करण्यात आलेले आहे व 95 शेतकऱ्यांनी संगोपन ग्रहाचे बांधकाम पूर्ण केले आहे व जिल्ह्यात 97 शेतकरी यांनी आजपर्यंत एक कोटी 37 लाख रुपयाचे या योजनेखाली उत्पन्न घेतलेले आहे संगोपन ग्रह उभारणीसाठी भांडवल उभारणीसाठी तालुकास्तरावर बँक अधिकारी शेतकरी गटविकास अधिकारी व यंत्रणेतील संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे समन्वय सभा घेणे बाबत सूचना देण्यात आले आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील योजनेचा लाभ घ्यावा अशी आव्हान माननीय श्री ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी केले आहे..