अमरधाम परिसरामध्ये चालकाचे नियंत्रण सुटले चालक ठार. तीन जखमी.

अमरधामलगत चालकाचे नियंत्रण सुटले; झाडानंतर भिंतीला घासली
प्रतिनिधी |
नाशिक
नाशिक जन्मत काल रात्री पहाटे दोन ते अडीच च्या दरम्यान स्वामी नारायण मंदिर तपोवनकडून अमरधामकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटून कार अमरधामच्या भिंतीलगत असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात कार चालक जागीच ठार झाला. तर शेजारी बसलेला मित्र गंभीर झाला आहे. कारमध्ये मागे बसलेले किरकोळ जखमी झालेले इतर दोघे बालंबाल बचावले. बुधवार (दि. ११) मध्यरात्री २.३० वाजता येतांना हा अपघात घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अंदाजे कारचा वेग 100 च्या पुढे असू शकतो कार वरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आढळली असे प्रत्येक दर्शनी दिसत आहे.
अंमलदार अमोल पाटील यांनी तक्रार दिली मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास एमएच ०१ बी.यु ३११२ कार स्वामी नारायण
मंदिराकडून अमरधामकडे येत असतांना चालक सुरज यादव (वय २१ रा. सौभाग्यनगर देवळाली कॅम्प) याचे नियंत्रण सुटल्याने कार भींतीलगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यादवच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. शेजारी

बसलेल्या राजेश ठाकूर याचे पाय फॅक्चर झाले. तर प्रियांश विश्वकर्मा आणि सतीष यादव हे किरकोळ जखमी झाले. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे आणि ए. एन. पाटील अधिक तपास करत आहेत. अंपघाता मध्ये गाडीचा चक्का चूर झालेला आहे.