नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज बंद रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा. धरण साठात वाढ 70 टक्के पाणी.
नागरिकांमध्ये संताप. भर पावसाळ्यात दुष्काळ

”
गंगापूर धरण ७० टक्क्यावर, तरीही पाणीकपात कायमच

नाशिक जन्मत दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर कशापीमुकने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे 70 टक्के पाणी सध्या या धरणात असून देखील नाशिककरांना पाणी कपाती संकटाला समोर जावे लागत आहे यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आज नाशिक शहरातील पाणीपुरवठा महानगरपालिकेने बंद केला आहे तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. यामुळे भर पावसाळ्यात नाशिक शहरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांवर पोहोचला असला, तरी नाशिककरांना दिलासा मिळालेला नाही. पालिकेकडून लागू करण्यात आलेली पाणीकपात अद्याप कायम असून, नियमित वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा असतानाही पाणीकपात कधी हटविणार, असा प्रश्न नागरिकांकडून
उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शहरातील जलवाहिनी व पंपिंग केंद्राशी संबंधित तांत्रिक कामांमुळे शनिवारी (दि. ११) शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठ्याचे अधीक्षक अभियंता धारणकर यांनी सांगितले की पाणी कपात बंद करण्यासाठी कोणती मीटिंग किंवा निर्णय घेतला नसून लवकरच तशी बैठक बोलून निर्णय घेण्यात येईल. दरम्यान आज आणि उद्या नागरिकांना पाणी संकटाला समोर जावे लागणार आहे.



