ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटी चोरणारे चोरटे अटक – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटी चोरणारे चोरटे अटक – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नाशिक जनमत दिनांक २९/०५/२०२६ रोजी ओझर शहरातील बाजारपेठेमधील स्वामी समर्थांच्या केंद्रातून एक चौकोनी आकाराची लोखंडी दानपेटी, त्यात अंदाजे १५,०००/- रुपये असलेली, अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याबाबत ओझर पोलीस ठाणे गुन्हा क्र. ११३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसरातील उपलब्ध तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करून मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खालील संशयितास ताब्यात घेतले.
१) ओंकार देविदास जाधव, वय २०, रा. दत्तनगर, शेलारमळा, ओझर, ता. निफाड.
ताब्यात घेतलेल्या संशयितास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने व त्याचा साथीदार (विधीसंघर्षित बालक) यांनी मिळून ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपी ओंकार जाधव याच्या कब्जातून चोरीस गेलेली लोखंडी दानपेटी व रोख १०४०/- रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच चोरी केलेल्या उर्वरित पैशांमधून आरोपीने नवीन कपडे व शूज खरेदी केल्याचे सांगितले असून त्यास पुढील तपासासाठी ओझर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी पुढील तपास ओझर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
वरील चोरीच्या गुन्ह्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.



