बाहेर गावी गेल्याची संधी साधून म्हसरुळला २.३० लाखांच्या दोन घरफोड्या, चार ठिकाणी प्रयत्न.
म्हसरुळला २.३० लाखांच्या दोन घरफोड्या, चार ठिकाणी प्रयत्न
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत
दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक नागरिक बाहेरगावी गेले असल्याचे संधी साधून चोरटे संधी साधत दोन घर फोड्या करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिवस-रात्र ग्रस्त वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात
म्हसरुळच्या स्नेहनगर, बोरगड परिसरात दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यात दोन लाख ३० हजारांचा ऐवज चोरी करण्यात आला. चार घरांमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या रहिवाशांच्या बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी करण्यात आली. याबाबत

प्रशांत गांगुर्डे (रा. स्नेहनगर, मूळ रा. कळवण) यांनी तक्रार दिली. दिवाळीनिमित्त बाहेर गेले असताना बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरी केले. शेजारी राहणारे महेंद्र धुवारे यांच्या फ्लॅटचा दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करत घरसामान अस्ताव्यस्त केले. बोरगड परिसरात चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला.