नासिक मध्ये एकाच दिवसात दोन अपघात दोन ठार एक जखमी.
एक स्लो पॉईंट अंबर येथे कंटेनर चे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू दुसरा अपघात पेठ रोड चारचाकी वाहनाची धडक, दुचाकीचालक ठार, एक गंभीर जखमी.
नाशिक । नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली असून अनेकांना आपले प्राण गमावे लागत आहे काल नाशिक शहरात दोन जण अपघातात ठार झाले आहे. अंबड एमआयडीसीतील एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी उत्तम बाबुराव गायकवाड या 48 वर्षीय तरुणाचा कंटेनर ने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चुंचाळे पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे
तर दुसऱ्या एका अपघातात अपघातांमध्ये अनोळखी कारने दुचाकीचा धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. रात्री ११ वाजता पेठरोडवर हा अपघात घडला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनूलाल गवळी (रा. रामशेज, आशेवाडी) यांनी तक्रार दिली. चुलत भाऊ गणेश चिंतामण गवळी व त्याचा मित्र सुनील रमेश गांगुर्डे दोघे दुचाकीने
(एमएच १५ जीवाय ८९०६) पेठरोडने येत असताना इंद्रप्रस्थनगरजवळ अज्ञात कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गणेशच्या डोक्यास व पोटाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर सुनील गांगुर्डे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अनेक सिंगल च्या ठिकाणी अनेक दुचाकी चालक सिग्नल तोडताना दिसतात यात अपघात होत असतात. अनेक ठिकाणी फक्त पोलीस अनेक वाहनांवर कारवाई करून फक्त दंड वसूल करण्यात रम्य झालेले दिसतात. अनेक जन कानाकोपऱ्यात मोबाईलवर गुंग होतात.
पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरांमध्ये अनेक सिंगल वर फिरून अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. असे नागरिक बोलू लागले आहेत.