रस्त्यात जबरी लूट करणाऱ्या चोरट्यांना दाखवला ‘कायद्याचा बालेकिल्ला’
सीसीटीव्हीच्या आधारे पांडवलेणी परिसरातून घेतले ताब्यात
सीसीटीव्हीच्या आधारे पांडवलेणी परिसरातून घेतले ताब्यात

रस्त्यात जबरी लूट करणाऱ्या चोरट्यांना दाखवला ‘कायद्याचा बालेकिल्ला’
प्रतिनिधी
नाशिक जन्मत रस्त्यात वांहन धार रकांना अडून त्यांच्याकडून जबरी लूट करणाऱ्या युवकांना सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पेठरोड, अश्वमेधनगररोडवर कामगाराकडे पैशांची मागणी करून नकार दिल्यावर जबर मारहाण करत मोबाइल आणि रोकड लुटून नेल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत पांडवलेणी येथील एका हॉटेलजवळ या दोघा लुटारूंना ताब्यात घेतले. उमेश खनपटे, सूरज पवार (दोघे रा. अश्वमेधनगर) अशी या संशयितांची नावे आहेत.
सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाचे महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. युनिट २ च्या कार्यालयात नेऊन चौकशी केली असता पेठरोड येथे जबरी लूट केल्याची त्यांनी कबुली दिली.