ब्रेकिंग
सकाळचा मॉर्निंग वाक पडला महागात. महिलेची सोनसाखळी चोरली.
नाशिक | पोलिसातर्फे मोठ्या प्रमाणात गस्त व गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तरी देखील गुन्हेगार गुन्हे करण्यास मागे पुढे बघत नाही. काल मखमलाबाद परिसरातील महिला मॉर्निंग वॉक करत असताना
गळ्यातील
मंगळसूत्र खेचण्याचा प्रकार सकाळी ६.३० वाजता दुर्गादवी Aloo मंदिराजवळ, मखमलाबादरोडयेथे घडला. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता दरगोडे यांनी तक्रार दिली. सकाळी मार्निंग वॉक करत असताना लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने गळ्यातील एक लाख १८ हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. पोलिस तपास करत आहे.