मखमला बाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरातील नागरिक कॉलनी अंतर्गत रस्त्यातील खड्ड्यांमुळे हैराण.
लोकप्रतिनिधी व नाशिक महानगरपालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
नाशिक जन्मत मखमला बाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरातील कॉलनी अंतर्गत रस्त्याची अतिशय दूरदशा झाली असून नागरिकांना पायी देखील चालता येत नाही .
गेल्या मे महिन्यापासून नाशिक शहरात पाऊस चालू आहे. गेल्या सहा महिन्यापासून नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे एकही कर्मचारी या भागात आले नाही किंवा या रस्त्याची पाहनी केली नाही. या भागात अनेक इमारतीचे कामे चालू असल्याने हायवा सारखी वाहने नेहमी या भागात येत असतात. त्यामुळे रस्त्यावर गुडघ्या एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना देखील गुडघावर पाण्यातून जावे लागते. अनेकवाहने कॉलनी अंतर्गत रस्त्यावर स्लीप होऊन पडले आहेत त्यामुळे अनेक अपघात देखील लहान मोठे दररोज चालू आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांचे गणवेश भरत आहे. नाशिक महानगरपालिकेने ताबडतोब या रस्त्याचे कामे लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेचे सर्व टॅक्स या भागातील नागरिक भरत असताना महानगरपालिकेच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाही. पाणीपुरवठा करताना देखील पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी देखील नागरिकांना पुरत नाही. अनेक समस्याने या परिसरातील नागरिक हैराण असून लोकप्रतिनिधी देखील या भागाकडे बघत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक देवाच्या भरोशावर राहत आहे. महादेव कॉलनी हा परिसर लवकरात लवकर समस्या मुक्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व डांबरीकरण करणे महत्त्वाचे झाले आहे. अन्यथा या भागातील नागरिक रस्त्यावर रस्ता रोको करण्याच्या तयारीत आहे.