ब्रेकिंग
नाशिक रोडच्या रोकडोबा वाडी मध्ये बादली मध्ये पडल्याने बालकाचा मृत्यू.
दहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू.
नाशिक जनमत नाशिकरोड । रोकडोबावाडीमध्ये दहा महिन्यांचे बाळ हे खेळताना पाण्याच्या बादलीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला. रोकडोबावाडी येथील मशिदीजवळील रहिवासी अजय तायडे यांचा दहा महिन्यांचा मुलगा रोशन हा बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरात खेळत होता. तो पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये
पडला. बाळ खेळत असल्याचे समजून आई स्वयंपाक करत होती. मात्र काही वेळाने रोशन कुठे दिसत नाही म्हणून शोध घेतला असता पाण्याच्या बादलीत रोशन पडलेला आढळून आला. त्याच्या आजोबांनी बिटको रुग्णालयात नेले, मात्र डॉ. उगले यांनी त्याला मृत घोषित केले. रोकडोबा वाडी परिसरात तसेच कुटुंबामध्ये रोशन याच्या मृत्यामुळे आक्रोश शोक व्यक्त करण्यात येत आहे.